जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड डॉ. बाबासाहेबांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं; यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात वातारण तापलं आहे. जळगाव शहरातही आव्हाडांविरोधात आज ३० रोजी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘जितेंद्र आव्हाडांचे करायचे काय ? खाली डोकं वरती पाय’ अश्या घोषणा देत आव्हाडांचे निषेध करण्यात आले.
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार, २९ रोजी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. त्यामुळे एकंदर वातावरण खूपच तापलेलं दिसत आहे.
जळगाव शहरात आव्हाडांविरोधात आज ३० रोजी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजुमामा भोळे आमदार, जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, राजेंद्र घुगे-पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई निंभोरे, अमित भाटिया, माजी महापौर सुनील खडके, राहुल वाघ, अमित साळुंखे, राजू मराठे, सागर पाटील, नगरसेवक गायत्री राणे, सुरेखा तायडे, अतुल बारी, विजू पाटिल, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, सुनिल सरोदे, पिंटू काळे, महादु सोनवणे, जिल्हा पदाधिकारी अजित वाघ, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मुविकोराज कोल्हे, आघाडी मोर्चाचे सुनील जाधव, प्रल्हाद सोनवणे, मिलिंद चौधरी, अरुण सपकाळे, महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भारती सोनवणे, नंदिनी दर्जी ,ज्योती राजपूत, दीप्ती चिरमाडे, नीला चौधरी, अश्विनी बिऱ्हाडे, प्रमिला ताई बिऱ्हाडे, गणेश बाविस्कर, चंद्रकांत शिंदे, अशोक घाडगे, जहांगीर खान, हर्षल चौधरी, स्वप्निल चौधरी, उन्मेश चौधरी, गजानन वंजारी, हर्षल चौधरी, हितेश राजपूत प्रदेश जिल्हा व मंडळ पदाधिकारी, सर्व प्रदेश, जिल्हा व मंडळ मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते,सुपर वॉरियर, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.