खुशखबर ! हवाई दलात नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

---Advertisement---

 

भारतीय हवाई दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. हवाई दलाकडून ‘अग्निवीर वायु INTAKE 01/2027’ अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळ agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. याशिवाय मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेले उमेदवारही पात्र ठरणार आहेत.

वयोमर्यादेच्या दृष्टीने अर्जदाराचे किमान वय १७.५ वर्षे असावे, तर कमाल वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ पूर्वी आणि १ जुलै २००९ नंतर झालेला नसावा. उंचीबाबत पुरुष आणि महिला दोघांसाठी किमान १५२ सेंटीमीटरची अट आहे. काही राखीव प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम iafrecruitment.edcil.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर ‘Online Registration for AGNIVEERVAYU INTAKE 01/2027’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यासोबतच छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरलेला फॉर्म भविष्यासाठी प्रिंट करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---