शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शनिवारी (२७ में) प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्या दमण येथील मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल कंपनीचे अधिकारी घेतील. डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी, बी. एस्सी. (केमिस्ट्री). एम. एस्सी. (केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक), बी. ई. ॲड बी. टेक (केमिकल, बायोटेक), डिप्लोमा पॉलिटेक्निक (केमिकल, मेकॅनिकल), बी. कॉम. आणि आयटीआय अशी पात्रता आहे. चालू शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी मुलाखती देऊ शकतात.
इच्छुकांनी शुक्रवारी (१६ मे) दुपारी दोनपर्यंत नोंदणी दोन गुगल फॉर्म लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती किंवा अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ. जवेश पाटील (९९२३४४१००४), प्रा. समीर शेख (८६६९१५३९६७), प्रा. अमित धनकानी (७३८५७५००१४), प्रा. गिरीश बडगुजर (८२७५३५२५४५२) यांच्याशी संपर्क साधावा.
मुलाखती शनिवारी (१७ मे) सकाळी साडेआठला पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात होतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, अंतिम वर्षाची गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र तसेच पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रे व बायोडाटा सोबत घेऊन यावे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूर पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांनी केले आहे.