सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पदांसाठी तब्बल 787 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीतून 7वी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. पात्र उमेदवारांनी ही तारीख लक्षात घेऊन अर्ज पाठवावा.
रिक्त पदे आणि पात्रता
भरतीसाठी विविध गटांमधील पदांसाठी पात्रता आणि शैक्षणिक अर्हता जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदांचा समावेश आहे.
गट क पदे
वरिष्ठ लिपीक – पदवी उत्तीर्ण, मराठी/इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र.
लघुटंकलेखक – एसएससी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन (80 श.प्र.मि.).
कृषि सहायक – कृषि तंत्रज्ञान/वनशास्त्रातील पदवी.
सहायक (संगणक) – संगणक विज्ञान/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स पदवी.
आरेखक आणि अनुरेखक – ड्राफ्ट्समन प्रमाणपत्र.
गट ड पदे
प्रयोगशाळा परिचय – 10वी उत्तीर्ण.
माळी – माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र.
शिपाई/पहारेकरी – 7वी किंवा 10वी उत्तीर्ण.
मजूर – 4 थी उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार वयात सवलत देण्यात येईल.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्ग: ₹1000/-
मागास प्रवर्ग/ईडब्ल्यूएस/अनाथ उमेदवार: ₹900/-
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹15,000 ते ₹1,12,400 पर्यंत पगार दिला जाईल.
महत्त्वाचे
भरतीसंबंधित अधिक माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर भेट द्यावी. सरकारी नोकरीच्या इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा