जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी जळगाव जिल्ह्यात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि.१० पासून तीन दिवसीय क्रिकेट लीगला सुरुवात होत असून दिवसभरात ९ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे लॉट्स पाडण्यात आले असून त्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ उद्यापासून शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सुरू होणार आहे. स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांचे २० संघ सहभागी होणार असून सर्व सामने नॉक आउट पद्धतीने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील आणि जळगाव शहरातील सर्व माध्यमातील खेळाडू खेळीमेळीच्या वातावरणात आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवणार आहेत. दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेत पहिल्या दिवशी ९ सामने पार पडणार आहेत.
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन
स्पर्धेसाठी सामन्याचे लॉट्स जाहीर करण्यात आले असून सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या, अपूर्ण संघ आणि पत्रकार व्यतिरिक्त असलेल्या संघांना बाद ठरवण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. आयोजक समितीमध्ये वाल्मिक जोशी, चेतन वाणी, वसीम खान, किशोर पाटील, जकी अहमद, सचिन गोसावी यांचा समावेश आहे.
असे आहे सामन्याचे वेळापत्रक
पहिला दिवस दि.१० फेब्रुवारी २०२५
सकाळी ८.०० वाजता…
१) प्रिंट मीडिया (टीम १) vs डिजिटल मीडिया
सकाळी ९.३०
२) यु ट्यूब मीडिया vs प्रेस फोटो ग्राफर
सकाळी ११ वाजता
३) चाळीसगाव vs रावेर
सकाळी १२.३०
४) मुक्ताईनगर विरुद्ध भडगाव
दुपारी २.०० वाजता
५) यावल विरुद्ध पाचोरा
दुपारी ३.३० मिनिटे ..
६) धरणगाव विरुद्ध भुसावळ
सायंकाळी ५ वाजता
७) अमळनेर विरुद्ध चोपडा
सायंकाळी ६.३० वाजता
८) संपादक विरुद्ध जामनेर..
दुसरा दिवस दि.११ फेब्रुवारी २०२५
सकाळी ८ वाजता..
इलेकट्रॉनिक्स मीडिया विरुद्ध प्रिंट मीडिया २
क्वाटर फायनल
१) सकाळी ११ वाजता
एम१ विरुद्ध एम३
२) सकाळी १२.३०
एम २ विरुद्ध एम ४
३) दुपारी २ वाजता
एम ५ विरुद्ध एम ८
४) दुपारी ३.३०
एम ६ विरुद्ध एम ९
५) सायंकाळी ५ वाजता
एम ७ विरुद्ध एम १०
दिवस तिसरा दि.१२ फेब्रुवारी २०२५
दोन सेमी फायनल
आणि एक फायनल
समारोप सोहळा आणि बक्षीस वितरण सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.