नवी दिल्ली: भारत आणि या दोन्ही देशाचे जगभरातील क्रिकेटचे चाहते आहेत. भारत पाकिस्तान या दोन्ही देश्याच्या क्रिकेट सामन्याची वाट पाहत असतात. हा सामना १० सप्टेंबरला होणार आहे. पण त्या दिवशी पावसाचा धोखा आहे. हा सामना झाला नाही तर काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.लीग स्टेजचा सामना न खेळल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल का?
आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबरला असो किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीत होणार हे स्पष्ट झाले आहे.10 सप्टेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा एकमेव सामना आहे जो आशिया कप 2023 च्या सुपर 4 फेरीत राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता,
मात्र आता भारत-पाकिस्तान सामन्यासाठीही ही व्यवस्था करण्यात आली आहे.त्यानंतर हे सामने इतर कोणत्याही ठिकाणी हलवले जाणार नसून कोलंबोमध्येच खेळवले जाणार असल्याचे समोर आले. नंतर पीसीबीलाही हा निर्णय मान्य करावा लागला. मात्र, त्यांनी एसीसीचे अध्यक्ष जय शहा यांना पत्र पाठवून विरोध दर्शवला आहे.रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचा धोका निर्माण झाला असून 90टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 10 सप्टेंबरला सामना होऊ शकला नाही, तर हा सामना 11 सप्टेंबरला होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबरला भारतीय संघ कोलंबोमध्ये श्रीलंकेशी सामना करताना दिसणार आहे. पाऊस पडला नाही आणि हवामान स्वच्छ राहिल्यास सामना 10 तारखेला पूर्ण होईल. पण आताच बोलायचे झाले तर हवामानाच्या अंदाजानुसार काही काळ पाऊस नक्कीच पडेल.;