राज्यसभा : महिला आरक्षण विधेयक आता लोकसभे मध्ये मजूर झाले आहे व आता राज्यसभेमध्ये मजूर होणार आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आम्ही महिलांना शक्तीच्या रूपात देवी आणि समाजाला दृष्टी देणारी आदर्श म्हणून पाहिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्यसभेत म्हणाले, “गुलामगिरीच्या काळात परदा पद्धतीत मोठी घट झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय संस्कृतीत महिलांकडे ऊर्जा आणि शक्तीच्या रुपात पाहिलं जातं. आमचा शब्दसंग्रह अशा पद्धतीचा आहे की, जगाने आम्हाला लेडीज फर्स्ट शिकवावं का? आम्ही आधीच नावांमध्ये महिलांना प्रथम सन्मान देतो, असं सांगताना नड्डा यांनी सीताराम आणि राधेश्याम या नावांची उदाहरणं दिली.
राज्यसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की या नवीन संसद भवनाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आली होती. काल नारी शक्ती वंदन कायदा लोकसभेत मंजूर झाला आणि मला खात्री आहे की आज राज्यसभेत तसाच तो पास होईल. कोणत्याही अडथळ्याशिवाय एकमताने विधेयक पास होईल, असंही नड्डा यांनी नमूद केलं.