न्याय मागावा तर कोणाला ? न्यायाधीशच निघाला लाचखोर, साताऱ्यात मोठी कारवाई

सातारा ।  न्याय आणि न्यायव्यवस्था ह्या समाजातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, आता न्यायाधीशच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे न्याय मागावा तर कोणाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा लाचलुचपत विभागाने लाच घेतल्याप्रकरणी न्यायाधीशावर मोठी कारवाई केली आहे. फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी ५ लाखांची मागणी करणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.

या संशयितांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश आहे. तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात अशी इतर दोघांची नावे आहेत.

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरु असून, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, न्याय आणि न्यायव्यवस्था ह्या समाजातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, आता न्यायाधीशच लाचखोर निघाल्याने न्याय मागावा तर कोणाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.