तरुण भारत लाईव्ह ।११ जानेवारी २०२३। शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिकत असलेल्या नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी टीना तुळसकर हिने दुसर्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना 10 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.
सकाळ सत्रातील शेवटची तासिका सुरू झाली असताना ही विद्यार्थिनी अचानक वर्गाच्या बाहेर येऊन तिसर्या मजल्यावरून खाली पडल्याने शाळेत गोंधळ उडाला असून चर्चेला उधाण आले आहे. त्यात मात्र उडी मारल्याचे कारणदेखील अस्पस्ट आहे. विशेष म्हणजे वर्गात शिक्षक तासावर जाण्याआधीच मुलीने उडी मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
लागलीच त्या विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकांनी आणि कर्मचारी विजयानंद हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथून रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
शिक्षक वर्गात जाण्यासाठी निघाले होते. ते जिन्यात असतानाच कुणीतरी पडले असल्याचे समजताच तेदेखील खाली आले.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी लागलीच त्या विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्या विद्यार्थिनीच्या कंबरेला आणि पायाला दुखापत झाली आहे. तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती मुख्याध्यापिका बी.एन.नरवाडे यांनी दिली.