---Advertisement---
नंदुरबारमध्ये हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या सभेत कालीपुत्र कालीचरण महाराजांनी हिंदू मुस्लीम मतदारांवर वादग्रस्त विधान केले आणि केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राजकारण, धर्म आणि मतदान व्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भूमिका मांडली आहे.
या हिंदू धर्म सभेत कालीचरण महाराजांनी काय वादग्रस्त विधान केलंय, ते पाहूयात ⬇️
हिंदु धर्म सभेत बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, आजचे राजकारणी हिंदूवादी नाहीत. “ते मुसलमानांसमोर कुत्र्यासारखे शेपूट हलवतात,” असे वक्तव्य करत त्यांनी राजकीय नेत्यांवर थेट टीका केली.
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांबाबत बोलताना ते म्हणाले :
“इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतातील मूळ धर्म नाहीत. ते धर्म नसून केवळ पंथ आहेत,” असा दावा केला. तसेच, “भारतातील 100 टक्के मुसलमान हे हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत,” असे विधान करत त्यांनी मुसलमानांना घरवापसीचे आवाहन केले.
मतदान व्यवस्थेवर भाष्य करताना कालीचरण महाराज म्हणाले की :
“मुसलमानांची व्होट बँक ही हिंदूंची चूक आहे, कारण हिंदूंची स्वतःची व्होट बँक नाही.” ते पुढे म्हणाले, “हिंदू समाज संख्येने मोठा असतानाही हिंदुवादी नाही. हिंदू व्होट बँक निर्माण झाली, तर राजकारणी आपोआप हिंदुवादी बनतील.”
हिंदू समाजावर टीका करताना त्यांनी सांगितले की :
“मुसलमान इस्लामच्या हितासाठी 100 टक्के मतदान करतात, मात्र हिंदू 45 टक्क्यांच्या वर मतदान करत नाहीत.” तसेच, “हिंदू आपल्या जातीवादासाठी मतदान करतात, हिंदू हितासाठी नाही,” असेही त्यांनी नमूद केले. सभेच्या शेवटी त्यांनी स्पष्ट आवाहन करत म्हटले की, “जो हिंदू हिताची गोष्ट करेल, त्यालाच मतदान करा आणि सातत्याने पाठिंबा द्या.”
राजकारणात हिंदुत्वाला पर्याय नसल्याचे ही कालीचरण महाराजांनी सांगितले :
“हिंदू जेव्हा हिंदू हितासाठी मतदान करतील, तेव्हा राजकारणी झक मारून हिंदू हिताचे काम करतील,” असा दावा कालीचरण महाराजांनी केला. या वक्तव्यामुळे नंदुरबारसह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, विविध स्तरांतून निषेध आणि समर्थन अशा दोन्ही प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









