---Advertisement---

कानसवाडी उपसरपंच हत्या प्रकरण : एकाला अटक, दोन फरार

by team
---Advertisement---

जळगाव : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अशातच अशीच एक घटना जळगावच्या कानसवाडा येथे आज शुक्रवारी (२१ मार्च) रोजी सकाळी ८ वाजता घडली. शिवसेनेचे (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज कोळी (वय ३६) यांची गावातील तिघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, आता या हत्येचं कारण समोर आलं आहे.

कानसवाडी गावातील तिघांनी आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे (शिंदे गट ) माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात चाकू आणि चॉपरने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोळी यांचा मृतदेह जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

आपल्या कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या खुनाच्या प्रकरणामध्ये भरत पाटील याच्यासह त्याच्या मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्यानंतर भरत पाटील पोलिसांच्या हाती लागला असून त्याची दोन्ही मुले अजूनही फरार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून दोन्ही संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment