Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. करण जोहर ५२ वर्षांचा असून तो आजवर सिंगल आहे. दरम्यान, करण जोहर स्वतः त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चेत राहिला आहे. जगभरात आपल्या यशाचा झेंडा फडकवणारा करण जोहर आता असे काही केले आहे ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करणने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करुन तो कोणाला डेट करतोय याचा खुलासा केलाय. करण जोहरने खुलासा करुन सर्वांनाच चकीत करणारं उत्तर दिलंय.
करण जोहरची पोस्ट
करण जोहरने इन्स्टाग्रामवर खुलासा केला की, “मी इन्स्टाग्रामला डेट करतोय. तो माझ्या सर्व गोष्टी ऐकतो. माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायला तो शिकवतो याशिवाय माझी बिलंही तो चुकवतो. त्यामुळे त्याच्यावर प्रेम न करण्याचं कोणतंही कारण मला सापडत नाही.” अशी पोस्ट करुन करण जोहरने सर्वांनाच चकीत केलंय. अशाप्रकारे करण जोहर कोणा व्यक्तीला डेट करत नसून इन्स्टाग्रामला डेट करतोय.
रिलेशनशिप स्टेटस बद्दल काय म्हणाला होता करण ?
गेल्या वर्षीच करण जोहरने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर उघडपणे भाष्य केले होते. त्याने फेय डिसूझाशी झालेल्या संभाषणात त्याच्या लव्ह लाईफवर उघडपणे भाष्य केले. यादरम्यान करणने तो सध्या सिंगल असल्याचे उघड केले. करण म्हणाला, ‘मी सध्या सिंगल आहे आणि बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये नाही. खरे सांगायचे तर, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात दीड रिलेशनशिपमध्ये आहे. मी माझ्या सिंगल स्टेटसचा किती आनंद घेत आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.’ हे ज्ञात आहे की ५२ वर्षीय करण जोहरने अद्याप लग्न केलेले नाही. परंतु, २०१७ मध्ये, त्याने निश्चितच सरोगसीद्वारे त्याची दोन मुले रूही आणि यश यांचे या जगात स्वागत केले, ज्यांना तो एकटाच वाढवत आहे.