करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत राजीनामा उद्या होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा दोन दिवसाआधीच राजीनामा घेला आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क
काय म्हणाल्या करुणा शर्मा ?
प्रसार माध्यमंही संवाद साधताना करुणा शर्मा म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. ते अजून जाहीर का झालेले नाही, याबद्दलची माहिती नाही. पण काल एसआयटी, सीआयडी चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे १०० टक्के उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
करुणा शर्मा यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली असताना आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले ?
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. करुणा शर्मा यांना माहिती मिळाली असेल, मात्र त्याबद्दल माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे, आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता, पण हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. वाल्मिक कराड हा हत्येतील आरोपी आहे, कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.