मुंबई : टीम इंडियाकडून खेळलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रिकेटपटूने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. या क्रिकेपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑलराऊंडर असलेला हा क्रिकेटपटू पुण्याचा असून त्याने महाराष्ट्राच रणजीमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.
कोण आहे तो खेळाडू ?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच प्रतिनिधीत्व करणारा महाराष्ट्राका प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव याने राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल”, असे केदार जाधवने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला की, मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे, पण आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत सांगता येणार नाही. राजकारणाच्या माध्यमातून मायभूमीसाठी काम करण्यास आवडेल. मी देशासाठी खेळल्यामुळे माझे सर्वच राजकीय पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, असेही केदार जाधवने सांगितले.
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवने 2014 साली श्रीलंका विरुद्ध वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. केदारने टीम इंडियाचं 73 वनडेमध्ये प्रतिनिधित्व केलं. केदारने या 73 सामन्यांमध्ये 101.60 च्या स्ट्राईक रेट आणि 42.09 सरासरीने 1 हजार 389 धावा केल्या. तसेच 27 विकेट्सही घेतल्या. तसेच 9 टी 20 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या.