घर बांधणे किंवा नवीन घरात राहायला जाणे हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. ही पूजा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मकता वाढवते.
गृहप्रवेश म्हणजे काय ?
हिंदू धर्मग्रंथांनुसार, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या पूजेला गृहप्रवेश पूजा म्हणतात. वाईट शक्तींचा नाश आणि सुख-समृद्धीसाठी ही पूजा महत्त्वाची मानली जाते. ज्योतिष शास्त्राने घरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रकार सांगितले आहेत, ज्यामध्ये अपूर्व गृहप्रवेश हा नवीन घरासाठी केला जातो.
गृहप्रवेश करताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
महिना, तिथी आणि शुभ दिवस पहा: योग्य तिथी आणि शुभ मुहूर्तानुसारच गृहप्रवेश करा.
गणपती आणि वास्तुपूजन: विघ्नहर्ता गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून वास्तुपूजन करा.
उजवा पाय प्रथम ठेवा: घरात प्रवेश करताना उजवा पाय प्रथम ठेवणे शुभ मानले जाते.
घरात फेरी मारणे: पूजा झाल्यावर घरातील मुख्य सदस्याने संपूर्ण घराची फेरी मारावी.
कलशाची प्रतिष्ठापना: स्त्रीने पाण्याने भरलेला कलश घेऊन घराला चक्कर मारावी व फुले टाकावी.
दूध उकळणे: गृहप्रवेशाच्या दिवशी दूध उकळणे शुभ मानले जाते.
40 दिवस राहणे: गृहप्रवेश केल्यावर 40 दिवस घर रिकामे ठेवू नये; किमान एक सदस्य राहणे आवश्यक आहे.
शुभतेसाठी पूजेला महत्त्व
गृहप्रवेश पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे शास्त्र सांगते. मात्र, वरील माहिती प्राचीन स्रोतांवर आधारित असून वैज्ञानिक आधार नाही.
(टीप : वरील माहिती सर्वसामान्य विश्वासांवर आधारित आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. अंधश्रद्धेला पाठिंबा दिला जात नाही.)