KGF अभिनेता यशच्या वाढदिवसाला घडला अपघात, तीन तरुणांचा मृत्यू

KGF स्टार यश आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. पण या आनंदाच्या क्षणासोबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त त्याचा कट आऊट लावताना विजेचा धक्का लागल्याने त्याच्या तीन चाहत्यांना जीव गमवावा लागलाय. अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

KGF फेम अभिनेता यश (रॉकी भाई) आज सोमवारी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या आवडत्या स्टारचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी, कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सुरंगी गावात काही तरुण मध्यरात्री त्यांच्या आवडत्या स्टारचे कटआउट्स लावत होते. यादरम्यान त्यांना विजेचा धक्का बसला. या घटनेत हणमंता हरिजन (21), मुरली नदविनमणी (20), नवीन गाझी (19) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी लक्ष्मेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.