---Advertisement---
धुळे : जिह्यातील चित्रपटगृहात “खालिद का शिवाजी” हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारकी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वखाली देण्यात आले.
त देण्यात आले.
निवेदनात आगामी ‘खालिद का शिवाजी ‘ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत. जसे महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते, त्यांच्या अंगरक्षकांपैकी ११ मुसलमान होते, त्यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर मशिद बांधली. तसेच चित्रपटाच्या शीर्षकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने जिल्ह्यात सदर ‘ खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना योग्य सूचना द्याव्यात. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात सामील असलेल्या सर्व ज्युरी , अधिकारी तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांबाबत अपप्रचार करणे या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी.
या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. याप्रसंगी चंद्रशेखर आझाद शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज धात्रक, बबनराव चौधरी, गोपाल पाटील, रोहित खैरनार, कार्तिक सूर्यवंशी, तुषार भागवत, भूषण गवळी, राज थोरात, भाविक सूर्यवंशी, जनक्रांती प्रतिष्ठानचे कुणाल चौधरी, हिंदुराष्ट्र सेनेचे विकास गोमसाळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शुभम बागुल, हर्षल गवळी, कुणाल तारगे, योगेश देशमुख, रवींद्र घाटोळे, रोहित पाटील, शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहीत देसले, वैभव कासार, बजरंग दल गोरक्षा प्रमुख रोहित विभांडीक, किरण पाटील, यांसह शिवभक्त, शिवप्रेमी हिंदुत्ववादी तरुण, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते .