खडगे यांनीही केली काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना कुत्र्याशी

---Advertisement---

 

नवी दिल्ली : राहुल गांधी, कुत्रा आणि बिस्कीट यांचा काय ऋणानुबंध आहे, माहिती नाही, पण या मुद्यावरून ते वारंवार अडचणीत येत असतात. राहुल गांधीच नाही तर अन्य काँग्रेस नेतेही कुत्र्यामुळे वादग्रस्त ठरतात.

आपल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बाहेर आलेल्या अशाच एका व्हिडीओवरून राहुल गांधी पुन्हा अडचणीत आले होते. या व्हिडीओमध्ये राहुल गांधीच्या गाडीवर एक कुत्रा दिसतो, राहुल गांधी या कुत्र्याला एक बिस्कीट खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात, पण तो खात नाही, त्यामुळे राहुल गांधी ते बिस्कीट एका कार्यकर्त्याला देतात. यावरून वाद निर्माण होतो. कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांला खायला दिले, असा आरोप झाला, भाजपाने या मुद्यावरून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या लेखी आपल्या कार्यकर्त्यांची इज्जत कुत्र्यापेक्षाही कमी आहे, ज्या नेत्याच्या लेखी आपल्या कार्यकर्त्याची किंमत कुत्र्यापेक्षाही कमी आहे, त्या पक्षाचे पतन होणारच, असा आरोप भाजपाने केला. याचा काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला. कुत्रा खात नसल्यामुळे मालकाच्या हातून कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी ते बिस्कीट त्या व्यक्तीला देण्यात आले, असा खुलासा तेव्हा काँग्रेसला करावा लागला.

जनरल मनोज नखणे यांच्या पुस्तकातील मजकुराचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी सातत्याने करत होते, या मुद्यावरून होत असलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या नातीला दिलेल्या कुत्र्याच्या पिलासोबत फुटबॉल खेळत असल्याचा आणखी एक ताजा व्हिडीओही चर्चेत आला आहे.

कुत्रा प्रकरणामुळे राहुल गांधीच नाही तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेही वादग्रस्त ठरले. दिल्लीत रामलीला मैदानावर आयोजित मेळाव्यात भाषण करताना खडगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना कुत्र्यांशी करत वाद निर्माण केला. ज्यांना तुम्ही बुध एजंट बनवता, विचारपूर्वक बनवा, असे आवाहन करत खडगे म्हणाले की, आमच्या येथे एक म्हण आहे. कुत्रा घेताना त्याला चांगल्या प्रकारे भुकंता येते का, ते पाहा, त्याचप्रमाणे बुध एजंट ठरवताना त्याला कुत्र्याप्रमाणे चांगले भुंकता यायला पाहिजे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---