पोसीस स्टेशनचा परिसर.. घाबरलेले,थकलेले भयकंपीत कुटुंबीय आता जाऊ की नको अशी मनःस्थिती. भिरभिरत्या नजरेने, आजूबाजूस पाहतात. कोणी पाहत तर नाही ना? या धास्तीनं लगबगीनं पोलीस कचेरीत येतात… आत काही युवक, एक युवती असते.. पोलीस आपल्या कामांमध्ये व्यग्र असतात आणि सुरू होते… ओळख परेड… पोलिसांचा त्या युवतीला प्रश्न, “तुझे काय म्हणणे आहे बाई…. तू या मुलाबरोबर लग्न केले आहेस का? आलेली ही बाई तुझी आई आहे का? हा माणूस तुझे वडील आहेत का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्या मुलीवर केली जाते. तीही धांदरलेली, काहीशी भयभीत… तिला पोलीस धीर देतात आणि पुन्हा तेच प्रश्न केले जातात. दडपणात इकडे तिकडे पाहत ती उत्तरते…न..न नाही, मी यापैकी कोणालाही ओळखत नाहीः यातील कोणीही माझे नाही… तिचा श्वास, दम भरून आलेता.. पण तिचे बोल त्या माता-पित्यावर आघात करतात. हृदयाचा ठोका चुकतो. जणू आभाळच कोसळते…
अरे, नऊ महिने जिला पोटात वाढवले. तिला ठेच लागली तर… वेदना त्या आई बापाला होतात अन् तीच मुलगी ‘मी यांना ओळखत नाही, हे माझे कोणी नाहीत, असे उत्तर देते. त्या वेळी काय वेदना त्या मातापित्यांना होत असतील, याची कल्पनाच करवत नाही… डोळ्यातील अश्रूच्या धारा थांबता थांबत नाहीत… थरथरत्या हातापायांनी ते उभ्या उभ्या कोसळतात… असे प्रसंग आज अनेक पोलीस स्टेशन्समध्ये दिसत असतात… ती यंत्रणाही हतबल असते…
हा लेखन प्रपंच एवढ्यासाठी की, ‘लव जिहाद’ सारखे प्रकार गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहेत. विशिष्ट कुटुंब हेरून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यांना विविध आमिषे दाखवली जातात आणि नंतर कुठेतरी एखाद्या अज्ञातस्थळी नेऊन एक दोन जणांच्या साक्षीने तिच्याशी विवाह उरकला जातो… तिला कल्पनाही नसते आपण या मोहात कसे गुरफटले जातोय… दुर्दैव असे की, या घटनांकडे पाहण्यात आपले प्रशासन फारसे गंभीर नसल्याचेच लक्षात येतेय. जळगाव जिल्ह्याचा विचार करता शेकडो युवती अशा पाशात अडकल्याचे लक्षात येते. सामाजिक संघटना याविरुद्ध आवाज उठवत असतात. मात्र त्यांचा आवाज, नातेवाइकांचा आक्रोश हे सर्व कायद्याचे रक्षक असलेली यंत्रणा दाबून टाकते. आभाळ कोसळते ते त्या मुलींच्या माता-पित्यांवर… काय करावे हेदेखील त्यांना सूचत नाही… जिल्ह्यात अम ळनेर, जामनेरसह विविध भागात या घटना वाढत्याचे लक्षात येते. गेल्या आठवड्यात अमळनेर येथे घडलेल्या घटनेने जनमानस हादरले आहे. या शहरातील तांबेपुरा भागात दहशत माजवून असणाऱ्या एका महिलेच्या मुलाने सुसंस्कृत घरातील तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून… विवाह करण्याचे आमिष दाखवत पळवून नेले आहे… यात पोलीस स्टेशनला केवळ युवती हरवल्याची नोंद झाली आहे. काही पोलिसांना सोबत घेऊन नातेवाइकांनी थेट पंजाब गाठले. जालंदर परिसर पिंजून काढला. मात्र त्या युवतीला कुठे गायब केले याचा पत्ता अद्याप लागू शकलेला नाही…
अमळनेरात दहशत पसरविणाऱ्या कुटुंबातील तो मुलगा असत्याचे समजते. तांबेपुरा भागात सिनेस्टाईल दहशत पसरविणाऱ्या एका महिलेचे एखाद्या चित्रपटातील खलनायकी अस्तित्व शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा मुद्दा ठरत आहे. सावकारीचा व्यवसाय करणारी ही महिला एखाद्या लेडी डॉन स्टाईलने गावात फिरत असते. आजूबाजूला काही गुंड मंडळी असते. त्यामुळे कोणी विरोध करायला धावत नाही… असेही समजते की, या महिलेची शहरात एक दोन नव्हे तर २२ ते २५ घरे आहेत. अंगावर लाखोंचे दागिने… प्रचंड पैसा… हा पैसा कोठून येतो, याचा कुणालाही पत्ता नाही.. मोटारसायकली, मोबाईल चोर पकडला की, आमची यंत्रणा मोठमोठ्या बातम्या व कर्तबगारी गाजवत्याचे सांगते. मग अशा दहशत पसरविणाऱ्यांकडे दुर्लक्ष कसे होते?… सरळ साधे अमळनेरकर है बघत असतात… उघड्या डोळ्यांनी हे सारे बघताना मनाला, हृदयाला यातना होतात.
मग याला आळा कोण घालणार? वेसन घालणार कोण? हप्तेबाजीचे कवच या व्यक्तींना असते असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. खासदार स्मिता वाघ यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व त्या पोलीस प्रशासनाला सतत सूचना करीत असतात… ही तेवढी जमेची बाजू… या शहरातून गेल्या काही महिन्यात १२ ते १४ युवती पळून गेल्या किंवा त्यांना पळवून नेले गेले आहे. असे समजते. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. संबंधित महिलेचे पंजाब कनेक्शन चर्चेचा मुद्दा ठरले आहे. येणारा पैसा कोणत्या देशातून येतो.. कशाच्या बदल्यात येतो… याकडे पोलीस प्रशासनाने गांभीयनि लक्ष द्यायला हवे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत… रस्ते वाहतुकीला शिस्त नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे खुनांचे सत्र सुरूच आहे… या सर्व घटनांना कोठेतरी चाप बसणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाते ती यंत्रणाच साथ देत नसेल तर समाजाने विश्वास कुणावर ठेवायचा? खोट्याचा हा गोरखधंदा थांबायला हवा…!
चंद्रशेखर जोशी