---Advertisement---

केएल राहुल-अथिया शेट्टी नववर्षात विवाहबद्ध होणार!

by team

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । भारतीय क्रिकेट संघाचा स्तर फलंदाज व उपकर्णधार के एल राहुल टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघातून काही काळ बाहेर झाला आहे. न्यूझीलंड  टी-२० व वन डे मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पुढील वर्षी होत भारत विरुद्ध श्रीलंका महिकेतसुद्धा तो अनुपस्थित असले असा अंदाज वार्तिवला जात आहे.

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेनंतर के एल राहुलने बीसीसीआयकडे सुटी मिळावि म्हणून विनंती केली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. अभिनेता सुनील शेट्टी यांची कन्या व अभिनेत्री अथिया शेट्टी ही केएल राहुल अनेक दिवसांपासून डेटिंग करीत आहेत. क्रिकेट मालिकेदरम्यान ते दोघे अनेकदा एकत्र दिसले.

राहुलवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली तेव्हाही अथिया त्याच्यासोबत होती. आयपीएलदरम्यान दोघांचे अनेक छायाचित्र समाजमाध्यमात सामायिक झालीत. सुनील शेट्टीने योग्य वेळ येताच अथिया व राहुल विवाहबद्ध होतील असे यापूर्वी  सांगितले होते.  आता बहुतेक ती वेळ आली आहे. हा विवाह सोहळा सुनेच्या लोणावळा येथील फार्म होऊसमध्ये होणार असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---