एरंडोल : काहीएक कारण नसताना महिलेवर एकाने चाकू हल्ला करत तिला जखमी केल्याचा प्रकार गुरुवारी, सकाळी धारागिरी येथे घडला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारागिरी येथील जिजाबाई रमेश भील (वय ४०) हि महिला आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी फकिरा दशरथ भिल याने काहीएक कारण नसतांना जिजाबाई भील या महिलेच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला व उजव्या हाताच्या पंजावर चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना घडली. जखमी महिलेला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांचा जबाब घेतल्यानंतर एरंडोल पोलिसांनी फकिरा भील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक मुकेश अमोदकर, योगेश जाधव, संतोष चौधरी, राजेश पाटील तपास करत आहेत.