---Advertisement---
भुसावळ : शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ फातीया वाचत असताना डिवचल्याच्या रागातून दोघांनी एका ३० वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना ईदच्या दिवशी सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी धाव घेत दोन संशयीतांना अटक केली असून जखमी शेख रिजवान शेख रहिम (३०, जाम मोहल्ला, भुसावळ) यास जळगाव येथील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले आहे.
फातीया वाचताना डिवलले
सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुस्लीम कब्रस्थानात मृतात्म्याला शांती लाभण्यासाठी नागरिक फातीया पढत होते व त्याचवेळी शेख रिजवान शेख रहिम (३०, जाम मोहल्ला, भुसावळ) हा आल्यानंतर त्याने डिवचत धम कावल्याने दोघांनी आपल्याजवळील चाकूने शेख रिजवानच्या पाठीवर तीनवेळा चाकूचे वार केले. या हल्ल्यात रिजवान रक्तबंबाळ झाल्याने काही वेळ पळापळ झाली. भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती मि ळाल्यानंतर त्यांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. संशयीत शेख दानीश शेख असीम उर्फ माया व जकरिया शेख जुनेद शेख (दोन्ही रा. भुसावळ) यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चाकू हल्ल्याला पूर्व वैमनस्याची किनार
भुसावळातील शरीर सौष्ठवपटू अफाफ अख्तर पटेल (३०, भुसावळ) या तरुणावर पूर्व वैमनस्यातून शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान बुधवार, ८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याचा तरुणाचा मृत्यू ओढवला होता. त्यावेळी १७ संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खून प्रकरणात प्रमुख संशयीत तेहरीन नासीर शेख (२७) असल्याने मयत अफाक पटेलच्या मित्रांनी हत्येचा बदला घेण्यासाठी तीन गोळ्या झाडत तेहरीनचा खून केला. ही घटना शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळी ७.२० वाजता जाम मोहल्ला भागातील डीडी सुपर कोल्ड्रींक्स व चहाच्या दुकानात घडली होती. दरम्यान, भुसावळात सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्याला देखील पूर्व वैमनस्याची किनार आहे. चाकू हल्ल्यातील जखमी व अटकेतील संशयीत हे भुसावळात यापूर्वी झालेल्या दोन्ही खून प्रकरणातील मृतांचे नातेवाईक असल्याचे सूत्रांनी सांगितले.









