तरुण भारत लाईव्ह।१७ जानेवारी २०२३। हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम गरम पदार्थ खायला खुप भारी वाटत. हिवाळ्यामध्ये भाज्या खूप स्वस्त मिळतात. मटार, मेथी, पालक, मुळा याच्यापासून बनवलेले पदार्थ आपण जवळपास ट्राय केले असतील. पण तुम्ही कधी कोथिंबीर च्या वड्या हा पदार्थ ट्राय केला आहे का? तसही हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त मिळते त्यामुळे तुम्ही हा पदार्थ हमखास ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोथिंबीर वड्या बनवण्याची सोप्पी पद्धत तरुण भारत च्या माध्यमातून.
साहित्य
तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, बेसन, लाल मिरच्या, हळद, जिरे,चवीनुसार मीठ. आणि कोथिंबीर.
कृती
प्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवावी जेणेकरून त्यावर असलेली माती निघून जाईल पद्धतीने कोथिंबीर स्वच्छ धुवावी. आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन टाकून त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्या, गुठळ्या जाईपर्यंत बेसन ढवळून घ्या. गुळगुळीत पिठात आणखी थोडे पाणी घाला,आपण भजे बनवायला जसे पीठ तयार करतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला बनवायचे आहे. नंतर लाल किंवा घरामध्ये लाल मिरच्या नसतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. आपल्याला आता मिरच्या आणि लसूणाची पेस्ट बनवायची आहे. वड्यांसाठी जे पीठ भिजवले आहे त्यामध्ये दोन किंवा तीन चमचे पाणी टाकून घ्यावे त्यानंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकावी व धने, हळद आणि मीठ चवीनुसार घालावं तयार केलेले पीठ चांगले ढवळून घ्यावे. लक्षात ठेवा पीठ पातळ झाल तर वडे कुरकुरीत होणार नाहीत.
पीठाचे रोल्स करून ते एका चाळणीमध्ये वाफवून घ्यावी. चाळणीला थोडे तेल लावावे जेणेकरून पीठ चाळणीला चिकटणार नाही.नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर ही चाळण १५ मिनिटे वाफवण्यासाठी ठेवावी. वाफवून झाल्यावर ते काही मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्या वड्या खुसखुशीत होईस्तर तळून घ्याव्या आणि गरमागरम सर्व्ह कराव्या.