तरुण भारत लाईव्ह । ८ जानेवारी २०२३। काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खर्चिक ठरण्याची शक्यता आहे, तर काही राशींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि आनंदाचा ठरेल . मेष ते मीन राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
मेष रास: मेष राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र फळे देणारा आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. विद्यार्त्याना अधिक मेहनत करावी लागेल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील. यासोबतच उच्च पदांवर बसलेल्या लोकांशी तुमचे संपर्क प्रस्थापित होतील. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
वृषभ रास: वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असेल. तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात सुद्धा उत्तम लाभ संभवतो. तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील.विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
मिथुन रास: मिथुन राशीच्या मंडळींना हा आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही. कोर्टाची कामे शक्य असल्यास पुढे ढकलावी. तुमचे आरोग्य उत्तम राहील. परिवारासोबत सहलीचा आनंद घ्याल.
कर्क रास: कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम असेल नोकरीत परिस्थिती चांगली राहील. व्यापारात नफा संभवतो. जुनी येणी असतील तर ती या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे. विद्यार्त्यांसाठी काळ चांगला आहे निकाल चांगला लागू शकतो. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह रास: सिंह राशींच्या मंडळींसाठी हा आठवडा संमिश्र फळे देणारा आहे. विद्यार्थानसाठी हा काळ विशेष प्रगती मिळवून देणारा आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर वैवाहिक जीवन या आठवड्यात खूप चांगले जाणार आहे.तुमच्या उदार स्वभावामुळे तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल.
कन्या रास: कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. व्यवसायात नफा मिळेल. प्रेमात अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या बोलण्यात खूप गोडवा दिसून येईल. ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल.
तूळ रास: तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील. व्यसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत वातावरण आनंदी असेल. कुटुंबासोबत वेळ छान जाईल.
वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडयात व्यवसायाची चिंता तुम्हाला त्रासदायक ठरू शकते कारण गेल्या अनेक दिवसांपासून व्यवसायात सातत्य नाही. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल त्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. नोकरीत परिस्तिथिती उत्तम राहील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील.
धनु रास: धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त यश मिळेल. प्रेमात यश मिळेल.वैवाहिक जीवनात गोडी राहील. विद्यार्थाना अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गृहिणींचे आरोग्य उत्तम राहील. घरात पाहुणेरावळे चा गोतावळा राहील त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.
मकर रास: मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. व्यसायाय तेजीत चालतील. मोठयांच्या आशीर्वादामुळे सगळी कामे होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल. प्रोजेक्ट वर काम करत असाल तर त्यात अपेक्षित यश मिळेल.
कुंभ रास: कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसाय नफा होईल. विद्यार्थांना हा आठवडा आनंद देणारा राहू शकतो. निकाल तुमच्या बाजूने लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नाहीतर जुने आजार डोके वर काढू शकता.आळसपणा सोडावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकत.
मीन रास: मीन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. विद्यार्थाना परीक्षेत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गृहिणींना हा काळ आनंदाचा असेल. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणीत पडू नका.