राष्ट्रीय युवा दिनाचे महत्व!

तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२३। आज म्हणजे, १२ जानेवारीला भारत राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. महान आध्यात्मिक आणि सामाजिक नेत्यांपैकी एक, स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एका कालीन कुटुंबात झाला.  स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. लहानपणापासून त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता या धार्मिक पुस्तकातून ज्ञान मिळवले होते.

११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्मपरिषद भरली होती. या भाषणांमध्ये त्यावेळी स्वामीजींनी ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणून भाषणाची सुरुवात करताच तेथे जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. पूर्व पश्चिमेला भेट विवेकानंद शिकागो येथील जागतिक धर्माच्या संसदेत बोलतात आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा पाश्चिमात्य देशांना परिचय करून देतात. 1879 साली त्यांनी प्रेसीडेन्सी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ईश्वराच्या शोधात असलेल्या विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस हे गुरुस्थानी लाभले आणि त्यांच्या जीवनाने वेगळी दिशा घेतली.

स्वामी विवेकानंद यांनी खूप कमी वेळेत वेद आणि योग यांचा प्रचार जगभर केला.त्यांच्या मते, हिंदू धर्म म्हणजे फक्त पारंपारिक ग्रंथ नसून आखिल मानव जातीने अनुभवलेले आध्यात्मिक परमोच्च शिखर आहे.स्वामी विवेकानंदानी तरुणांना मोलाचे मागर्दर्शन केले  ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, असा महान संदेश त्यांनी दिला. विवेकानंदांच्या मते वेदान्त तत्वज्ञान हेच खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण देतंय. वेगवेगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते वेदान्त तत्वज्ञानामधून शिकता येतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की हिंदू धर्माचा खरा संदेश हा मनुष्याला वेगवेगळ्या संप्रदायात विभागणी करणे नसून सर्वांना मानवतेच्या एका सूत्रात बांधणे हा आहे.

विवेकानंदांचे जीवन आणि शिकवण तरुण मनांसाठी प्रेरणादायी आहे.स्वामी विवेकानंदांच्या शिकवणी आणि विचारसरणीद्वारे तरुणांना प्रबोधन करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने 1985 मध्ये 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला. विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1984 मध्ये घेण्यात आला आणि तो पहिल्यांदा 12 जानेवारी 1985 रोजी साजरा करण्यात आला.