---Advertisement---
मुंबई : पावसाळ्यात अनेकांना वडापाव, भजी, मोमोज, चायनीज यासारखे अनेक गाडीवर मिळणारे पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. पण, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते असे कोणी तुम्हाला सांगितले तर?
आणि बऱ्याच लोकांना रक्ताचे प्रॉब्लेम असतात तसेच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि खुप आजारांना समोर जावं लागत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या शरीराला ‘व्हिटॅमिन सी’ ची गरज असते. ते व्हिटॅमिन्स आपल्याला फळांतून मिळतात.शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ महत्वाचे असते. संत्र्याचा रस, लिंबू पाणी, आवळ्याचा रस, अननसाचा रस, स्ट्रॉबेरी, किवी फळ यांचे सेवन केल्याने शरीराला मुबलक
प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते. ऍनिमिया हा आजार होण्याचा धोका टळतो. या आरोग्यदायी पेयांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.तसेच शरीरातील लोह वाडवण्यासाठी ओली खजुर, अंजीर,भिजलेले बदाम, या सारख्या गोष्टींचा आहारात समावेश केल्यामुळे लवकर रक्त वाडवण्यासाठी मदत होते.









