फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात . फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात . थंडीच्या दिवसांत बाजारात हमखास दिसणारे फळ म्हणजे सिताफळ. . असंख्य गुणधर्मांनी युक्त असलेले सिताफळ या काळात खायलाच हवे. सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑकसीडेंट असतात , जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते जे आपल्याला हृदयविकारापासून वाचवते. हे फळ चवीला अतिशय गोड असते .. त्याचप्रमाणे सीताफळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.
सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर ठरते.
सिताफळात कॅल्शियम मॅग्नेशियम हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत हाडे दुखण्याचे किंवा सांधेदुखीचे प्रमाण वाढते त्यावर सिताफळ खाणे फायदेशीर ठरते.
सिताफळामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे आपली त्वचा आणि केस निरोगी ठेवते. हे फळ डोळ्यांसाठीही चांगले मानले जाते. यामुळे अपचनाची समस्या दूर होते
कॅलरी – 120 के प्रथिने – 2.51 ग्रॅम कर्बोदकांमधे – 28.34 ग्रॅम कॅल्शियम – 16 मिग्रॅ लोह – 0.43 मिग्रॅ मॅग्नेशियम – 27 मिग्रॅ फॉस्फरस – 42 मिग्रॅ पोटॅशियम – 459 मिग्रॅ जस्त – 0.26 मिग्रॅ.
सिताफळामध्ये कॅटेचिन, एपिकेटिन्स आणि एपिगॅलोकेटिचिन सारखे घटक असतात. यापैकी काही कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सिताफळ शरीरातील जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत..