अनेक लोकांना चहा पिणे खूप आवडते . सकाळी चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरु होत नाही. भारतातील सुमारे ९० टक्के लोक रोज सकाळी नाश्त्यापूर्वी चहा पितात. पण तुम्हाला माहित आहे का. चहा पिल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारे हानी पोहचत असते. चहा मुळे आपली मेंदूची शक्ती कमी होते तसेच विचार करण्याची क्षमता कमकुवत होते. चहा मध्ये भरपूर फ्लोराइड देखील असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. जर तुम्हाला सकाळी चहा प्यायची सवय असेलच तर तुम्ही चहा ऐवजी ग्रीन टी चा वापर करू शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर ग्रीन टी चा समावेश केलात तर ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकत.
ग्रीन टी प्यायल्याने तुमच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या तुम्हाला भेडसावत नाही. आपण फीट आणि निरोगी रहावं हे प्रत्येकाला च वाटत असत . तुम्हाला फिट ठेवण्यासाठी ग्रीन टी तुम्हाला चांगल्याप्रकारे मदत करू शकते.
ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल आढळतात, जे ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात. ते प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. ग्रीन टी चा फायदा जसा आपल्या शरीराला होतो तसाच आपल्या त्वचेसाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. ग्रीन टी प्यायल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग साफ होतो आणि तुमचा चेहरा ग्लो करायला लागतो . मन तंदुरुस्त ठेवणे ग्रीन टी तुमच्या मेंदूला चालना देण्याचे काम करते.