तरुण भारत लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । माणसाला चांगले वाईट अशी स्वप्न पडत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक स्वप्नामागे एक शास्त्र आहे. तुम्हाला जे काही स्वप्न पडत असतात त्याचे स्वप्नशात्रामध्ये वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. तर कोणते स्वप्न शुभ असतात व कोणते अशुभ असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत.
स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे : स्वप्नात जर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसत असेल तर या स्वप्नाचा अर्थ आहे कि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आहे. आणि तुम्हाला अचानक धनसंपत्तीची प्राप्ती होऊ शकते.
स्वप्नात देव दिसणे : जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर हे स्वप्न अतिशय शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे कि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर हे स्वप्न कोणसोबतच शेयर करू नये.
स्वप्नात प्रेत दिसणे: जर तुम्हाला स्वप्नात कोणाचे प्रेत स्वप्नात दिसत असेल तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाहीये. कारण हे स्वप्न दर्शवते कि तुमची भविष्यात तुमची प्रगती होईल. आणि जर तुम्ही असे स्वप्न कोणासोबत शेअर केले तर तुमच्या प्रगतीला बाधा येण्याची शक्यता आहे.
स्वप्नात स्वतःच लग्न होताना पाहणे: जर स्वतःच लग्न होताना पाहणे हे तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर याचा संकेत असतो कि तुमचं लग्न तुमच्या आवडत्या व्यक्तीशी होण्याची शक्यता असते.
स्वप्नात शिवलिंग पाहणे: तुम्हाला जर स्वप्नात शिवलिंग दिसत असेल तर ते खूप भाग्यवान समजले जाते. याचा अर्थ असा कि तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे.