---Advertisement---

Kolhapur Murder Case : लिव्ह इन रिलेशनचा थरारक अंत; पार्टनरचा चाकू भोकसून हत्या करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

---Advertisement---

कोल्हापूर : अख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारं कोल्हापूर हत्याकांड सध्या चर्चेत आहे. लिव्ह इन रिलेशशिप मध्ये असलेल्या तरुणाने आपल्या पार्टनरची हत्या केली आहे. या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलं आहे. लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या या तरुणाने स्वतः आत्महत्या केली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर तो फरार होता. गुरुवारी सकाळी त्याने त्याच्या मूळगावी गळफास घेत आत्महत्या केली.

कोल्हापूर कसबा बावडा येथील जय भवानी गल्लीत समीक्षा उर्फ सानिका भरत नारसिंगे (वय २३) ही आपल्या आई आणि लहान बहिणी भावासोबत वास्तव्याला होती. तिचे २०१८ साली लग्न झाले होते. परंतु, लग्नाच्या तीन महिन्यानंतरच पतीशी पटत नसल्याने नवऱ्याला सोडून दिले होते. यानंतर ती जय भवानी गल्लीत राहायला गेली होती. तिच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. तिची आणि मासे विकून उदरनिर्वाह करायची. तसेच समीक्षा ही इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करुन आईला हातभार लावत होती.

या कामाच्या निमित्ताने तिची ओळख ओळख कोल्हापुरात कामासाठी आलेल्या तेलंगणा येथील तरुणी आयशू आंपले आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारा संशयित सतीश यादव यांच्याशी झाली. यानंतर सतीश व समीक्षा हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. या दोघांसोबत त्यांची मैत्रीण आयशू देखील राहत होती. परंतु. मागील महिन्यांपासून समीक्षा व सतीश यांच्या सतत वाद होऊन भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून आठ दिवसापूर्वीच समीक्षा आपल्या आईकडे मैत्रीण आयशू सोबत राहायला गेली होती. यादरम्यान सतीश समीक्षाला वारंवार फोन करुन त्याची भेट घेण्याचा आग्रह करीत होता.

समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी आपलं सामान आणण्यासाठी मंगळवारी दुपारी फ्लॅटवर गेल्या. यावेळी साहित्य आवरत असताना समीक्षाने सतीशला फोन केला. फ्लॅटवर 15 मिनिटांनी सतीश देखील आला. सतीशने पुन्हा लग्नासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद वाढत जाऊन सतीशने अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार करत तिला ठार मारले.

यानंतर सतीश यादव हा फरार होता. गुरुवारी सकाळी सतीश त्याच्या मूळगावी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे सतीश यादवने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश यादवचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment