अमळनेरात कोळी समाजातर्फे काढण्यात येणार बिऱ्हाड मोर्चा; काय आहेत मागण्या ?

अमळनेर/चोपडा : तालुक्यातील आदिवासी कोळी समाजातर्फे टोकरेकोळी ‘एसटी’ दाखल्यांसाठी सोमवार, १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून येथील तिरंगा चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रांत कार्यालयाकडे जातप्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना सबळ पुरावे जोडलेले आहेत. त्यांची दोन वेळेस तपासणी व सुनावणीही झालेली आहे. अशा प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरण धारकांना तात्काळ टोकरेकोळीचे दाखले मिळाले पाहिजेत. तसेच संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासह निवास, भोजन व शौचालयाची व्यवस्था करावी, असे नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, विद्यमान खासदार  स्मिता वाघ, माजी आमदार, तहसिलदार, पोलीस अधिकारी यांना देण्यात आलया आहे.

या प्रसंगी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), जेष्ठ समाजसेवक मधुकरगुरु सोनवणे (अमळनेर), चोपडा सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर यांचेसह सामा. पदाधिकारी हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपीचंद कोळी, सुकदेव सोनवणे, चंद्रशेखर सुर्यवंशी, प्रविण कोळी, भुषण कोळी, हिरामण कोळी, गणेश बाविस्कर, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, गोपाल देवराज, भीमराव कोळी, विशालराज बाविस्कर, अनिल कोळी, पांडुरंग कोळी, भीमराव सपकाळे, प्रेमकिरण कोळी, हिरामण कोळी, किरण शिरसाठ, पवन कोळी, गुणवंत साळवे, भगवान कोळी, चंद्रशेखर कोळी, रामचंद्र सोनवणे, सागर सोनवणे, विश्राम कोळी, लोटन कोळी, राजेंद्र लोहारे, चेतन कोळी, गणेश कोळी, वसंत कोळी, प्रदीप लोहारे, वासुदेव लोहारे, राकेश कोळी, विक्रम शिरसाठ यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.