---Advertisement---
बाजारात अनेक प्रकारचे मीठ उपलब्ध आहे. काळे मीठ, दगडी मीठ, गुलाबी मीठ ज्याला लाहोरी मीठ असेही म्हणतात आणि समुद्री मीठ जे पांढरे मीठ आहे. भारतात लोक स्वयंपाकासाठी पांढरे मीठ वापरतात. हे मीठ तुम्हाला प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज मिळेल आणि त्याची किंमत १० ते ५० रुपये प्रति किलो पर्यंत असते. पण एक मीठ असही आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात एक मीठ आहे ज्याची किंमत प्रति किलो ३० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हे मीठ कोरियामध्ये बनवले जाते आणि त्याचे नाव कोरियन बांबू मीठ असे आहे. कोरियन भाषेत त्याला जुग्योम असेही म्हणतात.
कोरियन बांबू मीठ इतकं महाग का आहे?
कोरियन बांबू मीठाची वैशिष्ठ्य म्हणजे ते बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातील पोषक तत्वे, ज्यामुळे हे मीठ जगातील सर्वात आरोग्यदायी आणि महागडे मीठ मानले जाते. हे मीठ बनवण्यासाठी सुमारे ४५ ते ५० दिवस लागतात. हे मीठ बांबूच्या नळ्यांमध्ये भरले जाते आणि उच्च तापमानावर शिजवले जाते. हे मीठ ८०० ते १,५०० अंश सेल्सिअस तापमानात भट्टीत ९ वेळा भाजले जाते. मीठ भाजताना, बांबूतील पोषक घटक मीठात शोषले जातात. त्यामुळे इतर मिठाच्या तुलनेत त्यातील खनिजांचे प्रमाण वाढते. या मिठाचा रंग आणि चव देखील इतर मिठांपेक्षा वेगळी असते. या सर्व प्रक्रियेत मीठ वारंवार वितळून घट्ट होत जातं. त्यामुळे हे मीठ इतर मिठांच्या तुलनेत खास बनते. हे मीठ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच त्याची किंमतही जास्त आहे.
प्राचीन काळापासून वापरल जातंय कोरियन बांबू मीठ
कोरियन बांबू मीठ प्राचीन काळापासून कोरियामध्ये वापरल जात आहे. ते स्वयंपाकासाठी आणि औषधांमध्ये देखील वापरले जाते. कोरियामधील काही पारंपारिक उपचारांमध्ये देखील हे मीठ वापरले जाते. या मीठात बांबूचे पोषक घटक असतात. तसेच कोरियन बांबू मीठात खनिजांचे प्रमाण खूप जास्त असतात जसेकी लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जे आपल्या शरीरासाठी पोषक असतात. यामुळेच हे मीठ इतर मिठांपेक्षा आरोग्यदायी मानले जाते. जर तुम्ही हे मीठ मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते पचन सुधारते. ते हाडे आणि दात देखील मजबूत करते.
कोरियन बांबू मीठाची किंमत?
कोरियन बांबू मीठ भारतात देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत सुमारे ३०,००० ते ३५,००० रुपये प्रति किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, कोरियन बांबू मीठ सुमारे $३४७ ते $४०० प्रति किलोला विकले जाते. तुम्ही ते ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.









