देशातील सर्वात मोठे कोचिंग हब मानले जाणारे कोटा, विद्यार्थ्यांवरील वाढत्या शैक्षणिक दबाव आणि मानसिक ताणामुळे चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमुळे कोचिंग उद्योग आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
एकाच दिवसात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने राजस्थानचे कोचिंग शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता, नीटची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येची बातमी समोर आली, त्यानंतर काही तासांतच, दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली.
कोटामध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्या खोलीत मृतदेह आढळला. हा विद्यार्थी २२ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेला बसणार होता. गेल्या २२ दिवसांत कोटा येथे ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
आई मुलाला भेटण्यासाठी आली अन्…
मृत विद्यार्थी हा आसामचा रहिवासी होता आणि आयआयटी-जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे आला होता. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास विद्यार्थ्याची आई कोटा येथे पोहोचली होती. मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला असता मुलाचा मृतदेह दिसला. हे पाहून विद्यार्थ्याची आई तिथे बेशुद्ध पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केले.
५ तासांत दोन विद्यार्थ्यांची
राजस्थानचे कोचिंग शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये या वर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दुर्दैवी घटना सुरूच आहे. गेल्या ५ तासांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. सकाळी ९ वाजता, कोटा येथे राहून पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेची NEET UG ची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मृत विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी होता. तथापि, दोन्ही विद्यार्थ्यांकडून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.