Kumbh Mela 2025 : जाणून घ्या भुसावळमार्गे धावणाऱ्या गाडीचे वेळापत्रक

Kumbh Mela 2025 :  सनातन हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याचे खूप धार्मिक महत्त्व आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. या मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे घावणार असून, भुसावळमार्गे म्हैसूर-दानापूर विशेष एक्सप्रेस धावणार आहे. यामुळे जळगाव आणि भुसावळ येथील भाविकांना सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

गाडीच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास 

 

म्हैसूर-दानापूर (गाडी क्रमांक ०६२०७):

प्रस्थान: शनिवारी, दुपारी ४:३० वाजता (१८ जानेवारी, १५ फेब्रुवारी, १ मार्च २०२५)
पोहोच: मंगळवारी सकाळी १० वाजता
दानापूर-म्हैसूर (गाडी क्रमांक ०६२०८):

प्रस्थान: बुधवारी, रात्री १:४५ वाजता (२२ जानेवारी, १९ फेब्रुवारी, ५ मार्च २०२५)
पोहोच: शुक्रवारी, दुपारी ३:०० वाजता
या गाडीत उपलब्ध डब्यांची माहिती:

१२ एसटी श्री टियर कोच
६ द्वितीय श्रेणी स्लीपर कोच
२ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
२ लगेज डबे

भाविकांनी या गाडीचे आरक्षण लवकरात लवकर करावे, जेणेकरून प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. महाकुंभसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी ही गाडी मोठ्या प्रमाणावर सोय करेल.