कुऱ्हा दुध डेअरीचे चेअरमन भगवान धांडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

भुसावळ : जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे येथे चेअरमन भगवान धांडे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून दुध डेअरीची इमारत उभारण्यात आल्याबद्दल जळगाव येथे दूध संघाच्या चेअरमन कार्यशाळेत संस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच हे भगवान धांडे यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दुध संघाचे ज्येष्ठ संचालक ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालकांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. संस्थेने स्वतःच्या मालकीचा प्लॉट विकत घेऊन त्यावर लोकसहभागातून तालुक्यात उभारण्यात आलेली पहिली इमारत आहे.

लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी एकत्र येवून केलेले कार्य म्हणजेच लोकसहभागातून विकास होय. ग्रामीण विकासात लोकसहभागाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कुऱ्हे पानाचे येथिल दुध उपादक संस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच भगवान धांडे दुध डेअरीची ईमारत जास्तीत जास्त लोकसहभागातून उभी राहावी यासाठी निश्चय केला होता. त्यानुसार स्वतः पुढाकार घेवून व देणगी देवून सुमारे ६-७ लाखाचा लोकसहभाग मिळविला. त्यात दुध डेअरीचा बिल्डींग फंडच्या मदतीने ११ लाखाची दुध डेअरीच्या स्वमालकीच्या जागेत दुध उत्पादक संस्थेची इमारत उभी केली. तत्कालीन चेअरमन भुवन शिंदे यांच्या काळात संस्थेने जागा खरेदी केली होती. संस्थेच्या ईमारत बांधकामासाठी लागणारे पाणी उन्हाळ्यामध्ये चेअरमन यांनी स्वतःच्या मालकीच्या टँकरने विनामूल्य पुरवले त्याचप्रमाणे वेळोवेळी संस्थेस बांधकामासाठी चेअरमन यांनी अनामत देवून व संस्थेस अनमोल सहकार्य केले. तालुक्यामध्ये अनेक खाजगी व्यापारी व दूध डेअरी आहेत तरीसुद्धा कुऱ्हे येथील संस्था दर्जेदार दूध उत्पादनासाठी स्पर्धेत टिकून आहे. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे दूध टेस्टिंगसाठी घेतलेले दूध उत्पादकांना परत करण्यात येते तसेच दूध उत्पादकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते

इमारत उभारणीसाठी भगवान धांडे यांना खंबीर साथ मिळाली ती संस्थेचे संचालक भुवन शिंदे, सुरेश (अण्णा) शिंदे, सुलतान जाधव, सुनील धनगर, अरुण पाटील, मानसिंग जाधव, रविंद्र शिंदे , समाधान आठवले, सौ. दुर्गाबाई शिंदे, मीराबाई रंदाळे सचिव सुनील जैन व नुकतेच स्वर्गवासी झालेले स्व .रामधन महाजन व स्व. रमेश काशिनाथ पाटील यांची.