Ladki bahin yoajan : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यशासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” हि योजना २८ जून २०२४ रोजी सुरु केली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५०० असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास 17000 कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं आहे.योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणांनी कुटुंबासाठी औषधे खरेदी केले, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील देखील खरेदी केल्या आहे. जुलै महिन्यात सुरु झालेल्या या योजनेत त्यावेळी लाखो महिलांनी फॉर्म भरले होते.
राज्यातील लाडक्या बहिणींना शासनाने आज परत आनंदाची बातमी दिली आहे.राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.