Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पुणे जिल्ह्यातील अर्ज छाननीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे. योजनेच्या अर्जदारांपैकी मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
एकूण अर्जांची संख्या : पुणे जिल्ह्यात एकूण 21,11,946 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 20,84,364 अर्ज मंजूर झाले आहेत. 9,814 अर्ज त्रुटीमुळे पूर्णपणे अपात्र ठरले, तर 12,000 अर्जांची छाननी अद्याप प्रलंबित आहे.
त्रुटींची कारणे : पुणे शहरात 3,494 अर्ज अपात्र ठरले असून, 5,814 अर्जांत किरकोळ त्रुटी असल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंववडमधून तब्बल 4 लाख 32 हजार 890 अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत.
हवेली तालुक्यातील आकडेवारी : हवेली तालुक्यात सर्वाधिक 4,19,859 अर्ज आले होते, त्यापैकी 4,15,510 अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र, 1,166 अर्ज अपात्र ठरले आहेत.
योजनेची स्थिती:
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर छाननी प्रक्रिया गतीने सुरू आहे. अर्जांची तपासणी प्रक्रियेमुळे पात्र आणि अपात्र अर्जांची यादी अधिक स्पष्ट होत आहे. पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
महिला बालकल्याण विभागाचा पुढील उद्देश :
शिल्लक असलेल्या अर्जांची तपासणी पूर्ण करणे. अपात्र ठरलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक माहिती पुरवणे.