---Advertisement---

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी मिळणार ? आली मोठी अपडेट

---Advertisement---

महायुतीच्या सरकारच्या स्थापनेनंतर महिलांना विशेषतः “लाडकी बहीण” योजनेसंदर्भात मोठी अपेक्षा आहे. निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे राज्यात महिलांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या विविध योजनांचे भवितव्य चर्चेचा विषय बनले आहे. “लाडकी बहीण” योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत महिलांचे लक्ष लागले आहे. अशातच आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल. यासोबतच त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, त्यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख किंवा त्यासंबंधीचे अधिक तपशील त्यांनी स्पष्ट केले नाहीत.

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानानुसार, महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन झालं आहे आणि ते चांगलं काम करत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की, सर्व विभाग आपापलं कार्य करीत आहेत आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दोन ते तीन दिवसांत दिला जाणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही अडचण नाही, अशी त्यांनी खात्री दिलीय.

दरम्यान, आदिती तटकरे यांनी “लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे म्हटलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या नियमांचे पालन करूनच अर्जांची छाननी केली जाईल, आणि नियमबाह्यपणे कोणताही अर्ज बाद केला जाणार नाही.

आदिती तटकरे म्हणाल्या की, बदल कशा पद्धतीने केले जातील आणि कोणते निकष लागू होतील, याबद्दल सरकारचा निर्णय अंतिम असतो. तसेच, तक्रारींच्या बाबतीत छाननी कशी केली जाईल, यावरही निर्णय सरकारच घेतो. सध्यातरी यासंदर्भात कोणतीही चौकशी किंवा कारवाईची आवश्यकता नाही, असा संकेत त्यांना दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---