Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतल्याच्या प्रकरणांमध्ये धुळ्यातील नकाणे गावातील एक वेगळे प्रकरण समोर आले आहे.
भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने चुकीने दिलेल्या माहितीमुळे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे ७,५०० रुपये जमा झाले होते.
या महिलेने अर्ज भरताना मुलाचे आधार कार्ड दिल्याने, त्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा झाले. ही चूक लक्षात आल्यानंतर भिकूबाई खैरनार यांनी स्वतः पुढे येऊन चूक मान्य केली आणि शासनाला आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे परत केले. महिलेच्या प्रामाणिकपणाचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे.