Ladki Bahin Yojana : राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
वयाचा गट : २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ.
दरमहा आर्थिक सहाय्य : १५०० रुपये.
आतापर्यंतचे मिळालेले पैसे : जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत पाच हप्त्यांचे एकूण ७५०० रुपये जमा झाले आहेत.
लाभार्थ्यांची संख्या : राज्यभरात २ कोटी ४७ लाख अर्जदार.
आर्थिक तरतूद
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना वेळेत पैसे मिळण्याची हमी मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वंचित
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही समस्या पुढे येत आहेत. जळगाव जिल्ह्यासह इतर भागांतील अंगणवाडी सेविकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही मोबदला अद्याप मिळालेला नाही. जळगाव जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार अंगणवाडी सेविका यामुळे वंचित आहेत. सरकारने अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवून त्यांना वेळेत मोबदला देणे गरजेचे आहे. यामुळे योजना अधिक सुलभतेने राबवता येईल.
संक्रांतीपूर्वी बँक खात्यात जमा होणार पैसे !
या योजनेतून संक्रांतीपूर्वी ३००० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हफ्ते एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.