Ladki bahin Yojana : खुशखबर… ‘या’ महिन्यापासून मिळणार 2100 रुपये !

Ladki bahin Yojana : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने यामध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार या योजनेच्या लाभधारक महिलांना मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना या योजनेचे पैसे दिले जातील.

या योजनेत 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे, आणि जे महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळू शकतील.

आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तथापि, बँक अकाउंट लिंक न असलेल्या महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अर्ज करणे अनिवार्य आहे, आणि खोटी माहिती देणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

निवडणुकीच्या पूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याबाबत काही अफवांमध्ये काही गोंधळ उडाल्या होत्या, मात्र सुत्रांनी स्पष्ट केलं आहे की अशी कोणतीही योजना बंद होणार नाही, आणि महिला लाभार्थ्यांना अजून अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.