---Advertisement---

Ladki Bahin Yojana : गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई; सरकारने खान्देशातील एका महिलेकडून 7 हजार 500 रुपये केले वसूल

---Advertisement---

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली, मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक निकष न पाळता अनेकांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यावर कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईत निकष डावलून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्या नावावर केलेल्या रकमांची वसुली केली जात आहे. तसेच, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरफायदा घेतल्याप्रकरणी ७५०० रुपये सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने या महिलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

‘लाडकी बहीण योजना’ महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात सहा हप्त्यांची रक्कम जमा झाली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकष डावलून सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते.

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू केली. त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांवरील कारवाईला सुरुवात झाली आहे.

धुळे, जळगाव, गडचिरोली, वर्धा, आणि पालघर यांसारख्या जिल्ह्यांतून अपात्र अर्जदारांच्या तक्रारी आल्यामुळे “केसरी” आणि “पिवळे” शिधापत्रक वगळता अन्य सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून मिळालेली रक्कम सरकारच्या तिजोरीत परत केली जात आहे. सरकारच्या या कारवाईमुळे लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment