---Advertisement---

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; आता ‘या’ महिलांनाच मिळणार २ १ ० ० महिना

by team
---Advertisement---

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की, नाही हे तपासणं हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल, असं सांगितलं जात आहे.

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची एक मोठी यादी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत प्रत्येक महिलेला फायदा मिळावा यासाठी योग्य निकषांची तपासणी केली जाईल. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का ते तपासणे महत्त्वाचं आहे. आता या योजनेसाठी आपल्याला ऑनलाइन चेक करणे आवश्यक आहे.

योजनेसाठी कठोर निकषांची पडताळणी केल्याने योजनेतील लाभार्थींची संख्या कमी होऊ शकते. याचा परिणाम म्हणून, निधीची कमी झाली तरी योग्य महिलांना जास्त फायदा मिळू शकतो. योजनेतील बदलांची तंतोतंत तपासणी करण्यात येईल, ज्यामुळे सर्वसामान्य महिलांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळू शकेल.

या निकषांची होईल पडताळणी
लाडकी बहिण योजनेसाठी काही विशिष्ट निकष आहेत. यामध्ये योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, इत्यादी गोष्टी तपासल्या जातील. याशिवाय, एकाच कुटुंबातील दोन महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असल्यास त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. तसेच, परित्यक्ता आणि विधवा महिलांनी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment