युपीत पुन्हा फिरला बुलडोझर; कट्टरपंथीयांच्या अवैध मालमत्ता जमीनदोस्त!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात कट्टरपंथीयांकडून हिंदू कुटुंबावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात हिंदू कुटुंबातील तरुणीचे अपहरण करायचे होते यादरम्यान हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि वार केल्याने कुटुंबातील एका महिलेसह दोन पुरुष जखमी झाले आहेत. दरम्यान, तपासाअंती महफूज, भुरे खान, युसूफ या कट्टरपंथीयांची घरे बेकायदेशीरपणे बांधल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे कट्टरपंथीयांचे बेकायदेशीर बांधकाम प्रशासनान बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहे. त्याचबरोबर, महफूज आणि भुरे खानला चकमकीनंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार मुरादाबादच्या मुंधापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासात सर्व आरोपींच्या मालमत्ता मिळवल्या असून बेकायदेशीरपणे आणि नियमांविरुद्ध बांधलेली आढळून आली आहेत.

कट्टरपंथीयांच्या घरांवरही प्रशासनाने बुलडोझर फिरवला असून प्रशासनाच्या कारवाईचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय या आरोपींच्या अन्य गुन्हेगारी कारवायांचा तपास सुरू असून दि. २८ जून रोजी प्रशासनाने मुख्य आरोपी मुस्लिमाचे घर पाडले होते. हे घर मुरादाबादच्या समदी शिवपुरी गावात बांधले गेल्याचे तपासातून उघड झाले आहे. यावेळी पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे पथकही उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत.