शेवटच्या सामन्यात भारताने जिंकले नाणेफेक, हा घेतला निर्णय

क्रिकेट:  आता आशिया कप २०२३  शेवटचा सुपर फोर सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जातो आहे. भारताचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत हरलेला नाही आहे. भारत आधीच अंतिम फेरीत पोहोचला असून बांगलादेश जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेवटच्या सामन्यात भारताने जिंकले नाणेफेक

कर्णधार कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. वर्ल्ड कप आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला.

आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.