Weather News : थंडीचा कडाका पुन्हा वाढणार, जाणून घ्या कधीपासून ?

#image_title

Weather News  : बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये बदल होऊन महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, थंडी गायब झाली आहे. अशातच पुन्हा कडाक्याच्या थंडीचा अंदाज हवामान अभ्यासकांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. मात्र फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, थंडी गायब झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात जळगावकरांना थंडी ऐवजी गर्मीचा सामना करावा लागला. मंगळवारी १८. ८ अंशावर असलेला पारा बुधवारी १४. ८ वर नोंदवला तर कमाल तापमानातही वाढ दिसून आली.

मंगळवारी ३०. ८ अंश असलेले कमाल तापमान बुधवारी ३२.२ वर पोहोचले. यामुळे बुधवारी दुपारी काहीसा चटका जाणवला. तर १५ डिसेंबरपर्यंत तापमानात जास्त घट होणार नाही. त्यानंतर पुन्हा पारा घसरून कडाक्याच्या थंडीचा अंदाज अंदाज हवामान अभ्यासकांनी दिला आहे.

थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज
या आठवड्यात जळगावकरांना थंडी ऐवजी गर्मीचा सामना करावा लागला. मंगळवारी १८. ८ अंशावर असलेला पारा बुधवारी १४. ८ वर नोंदवला तर कमाल तापमानातही वाढ दिसून आली.

मंगळवारी ३०. ८ अंश असलेले कमाल तापमान बुधवारी ३२.२ वर पोहोचले. यामुळे बुधवारी दुपारी काहीसा चटका जाणवला. तर १५ डिसेंबरपर्यंत तापमानात जास्त घट होणार नाही. त्यानंतर पुन्हा पारा घसरून कडाक्याच्या थंडीचा अंदाज हवामान अभ्यासकांनी दिला आहे.