रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या ! उद्या भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ ।   नागपूरकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. १८ तारखेला नागपूर विभागात सिंदी स्थानक आणि यार्ड रिमॉडेलिंग तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच नागपूर-वर्धा विभागात तिसरी व चौथी मार्गासाठी पायाभूत कामे सुरू असल्यामुळे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

याचा परिणाम  
७ मेमू गाड्या रद्द होतील.
२ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

रद्द होणाऱ्या गाड्या  

अमरावती – वर्धा मेमू
वर्धा – अमरावती मेमू
भुसावळ – वर्धा एक्स्प्रेस
वर्धा – भुसावळ एक्स्प्रेस
अमरावती – अजनी एक्स्प्रेस
अजनी – अमरावती एक्स्प्रेस
अमरावती – जबलपूर एक्स्प्रेस

शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या 

११०३९ कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस
ही गाडी वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट होईल व वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील.
११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
ही गाडी वर्धा स्टेशन येथून नियोजित वेळेत सुरू होईल, पण वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील.

प्रवाशांना सूचना 
यामुळे नागपूरकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपल्या प्रवासाची योग्य ती आखणी करून पर्यायी व्यवस्था करावी.