भारतीय तटरक्षक दलाचं पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ च आज जलावतरण

---Advertisement---

 

पणजी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र प्रताप या जहाजाचे जलावतरण होणार आहे. जलावतरण कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवरामणी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे जहाज तेल गळती शोधण्यासाठी प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे.

या प्रणालीमुळे विशेष आर्थिक क्षेत्रात व त्यापलीकडे सर्वसमावेशक प्रदूषण प्रतिसाद मोहीम राबवणे शक्य होते. गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या या जहाजात ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री आहे. ११४.५ मीटर लांब आणि ४,२०० टन वजनाच्या या जहाजाचा वेग २२ नॉट्सपेक्षा जास्त आहे आणि त्याची कार्यक्षमता ६,००० नॉटिकल मैल आहे. हे जहाज उच्च अचूकतेने काम करण्यास, चिकट तेलातून प्रदूषक घटक वेगळे करण्यास, दूषित घटकांचे विश्लेषण करण्यास आणि दूषित पाण्यातून तेल वेगळे करण्यास सक्षम आहे.

या जहाजामुळे आयसीजीच्या प्रदूषण प्रतिसाद, अग्निशमन व सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल. हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून यात ३० मिमी सीआरएन-९१ तोफ, एकात्मिक फायर कंट्रोल सिस्टीमसह दोन १२.७ मिमी स्थिर रिमोट-नियंत्रित तोफा, स्वदेशी विकसित एकात्मिक ब्रिज सिस्टीम, एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, स्वयंचलित ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि उच्च-क्षमतेची बाह्य अग्निशमन प्रणाली यांचा समावेश आहे. हे जहाज आयसीजीच्या कोची येथील तळावर तैनात केले जाईल.

स्वदेशी बनावटीच्या समुद्र प्रतापची वैशिष्ट्ये

  • समुद्र प्रताप नौका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गोवा शिपयार्ड येथे कार्यान्वित होईल
  • गोवा शिपयार्डने बांधलेल्या नौकेची देशातच निर्मिती करण्यात आली, यात ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य वापरले
  • ११४.५ मीटर लांब आणि ४,२०० टन वजनाची नौका २२ नॉट्सपेक्षा जास्त वेग आणि ६,००० नॉटिकल मैल प्रवास करण्यास सक्षम आहे
  • सागरी प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि भारताच्या सागरी पर्यावरणाचे तसेच संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होईल
  • यात १४ अधिकारी आणि ११५ खलाशी प्रवास करू शकतील आणि या नौकेमुळे तटरक्षक दलाची सागरी क्षमता बळकट होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---