नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणायचा की नाही याबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नाही. आम्ही पडताळणी करीत आहोत. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले याचा अभ्यास करीत आहोत’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलतांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि काही नियोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने फडणवीस आज शुक्रवारी नागपुरात आले होते. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना ‘लव्ह जिहाद’ बाबत छेडले.
येत्या हिवाळी अधिवेशनात आपण ‘लव्ह जिहाद’ संदर्भात कायदा आणणार आहात का? असा प्रश्न केला असता, त्यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगतानाच, पडताळणी आणि अभ्यास सुरु असल्याचे स्पष्ट केले.