Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यातला वाद नेमका काय, जाणून घ्या

Lawrence Bishnoi : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भरवस्तीत झालेल्या या हत्याकांडांमुळे पून्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. कारण लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. जो कोणी सलमान खानला मदत करेल त्याला अशा परिणामांना सामोरे जावे लागेत असा इशारा या हत्याकांडातून देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई कोण आणि त्याचा अभिनेता सलमान खान सोबत काय वाद आहे, जाणून घेऊया… े

लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबच्या फाजिल्का इथं एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात झाला. लॉरेन्सचे पालक सदन असल्याने सुरुवातीपासूनच सगळे हट्ट पुरवले गेले. लॉरेन्सने मोठ होऊन आयपीएस व्हाव अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.

त्यानुसार लॉरेन्स बिश्नोईचे शिक्षण अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने महाविद्यालयीन शिक्षणास सुरवात केली. लॉरेन्समध्ये लहानपणापासूनच नेतृत्वगुण होते. आणि कॉलेजपासूनच त्याने चुणूक दाखवली. त्याने महाविद्यालयात असतानाच एसओपीयु नावाने विद्यार्थी संघटना स्थापन केली.त्यानंतर त्याची वाट चुकली आणि लॉरेन्सने वेगळाच मार्ग निवडला. इतकंच नाहीतर कॉलेजमध्ये असतानाच त्याने रिव्हॉल्व्हर विकत घेतली आणि इथूनच त्याच्या गुन्हेगारीला वाव मिळाला.

हेही वाचा : Baba Siddiqui Murder Case । फक्त बापाचं नव्हे तर मुलगाही होता शूटरच्या रडारवर

 

सलमान खानला धमकी देण्याचं कारण

१९९८ मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानच्या विरोधात आहेत. तसेच सलमान खानचे चित्रपट व गाण्यांवरही बहिष्कार घातला आहे. हा समाज दुर्बल मानला जात असल्याने त्यांनी सलमानविरुद्ध आजपर्यंत आवाज उठवला नव्हता. पण गुन्हेगारीच्या जगतात लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आणि त्याने थेट सलमान खानलाच जीवे मारण्याची धमकी दिली.

सोशल मीडियावर जाहीर करायचा आपले गुन्हे

लॉरेन्सने प्रसिद्धीसाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी, विरोधी गटांशी हाणामारी, मारामारी, हवेत गोळीबार करणं असे प्रकार सुरू केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली. आणि तो प्रसिद्ध झाला. चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची एक वेगळीच क्रेझ होती. यानंतर त्याने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. बहुतेक लोक गुन्हे करून लपतात, पण लॉरेन्स बिश्नोईने गुन्ह्याची नवी कहाणी रचायला सुरुवात केली. त्याच्या टोळीतील कोणीही गुन्हा केला की लगेच तो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल साइटवर अपलोड करण्यास त्याने सुरुवात केली. त्याची स्टाईल पाहून तरुणाई प्रभावित होऊ लागली. एकीकडे त्याची गुन्हेगारी पातळी वाढत होती तर दुसरीकडे त्याची फॅन फॉलोइंगही वाढत होती.

लॉरेन्स बिश्नोईच परदेशात मोठं नेटवर्क

आता अनेक तरुण मुलं लॉरेन्सशी त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून कनेक्ट व्हायला लागली होती. याचाच फायदा घेत लॉरेन्सनेही आपलं नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. लॉरेन्सचे परदेशात विशेषतः मलेशिया आणि थायलंडमधील गुंडांच्याही संपर्कात होता. तसेच शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या डीलर्सनी लॉरेन्सच्या सोशल साइट्सच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरुवात केली.

 आणि बिश्नोई समाजाच नात

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा असुन हा समाज राजस्थानमधल्या जोधपूरजवळील थार वाळवंटाशी संबंधीत आहे. प्राण्यांचं रक्षण करताना मृत्यू आल्यास बिश्नोई समाजात त्या व्यक्तीला शहीदांचा दर्जा दिला जातो. प्राण्यांच रक्षण करणं, हिरवीगार झाडं न तोडणं असे काही नियम या समाजाने आखले आहेत. हा समाज नैसर्गिक गोष्टींवर प्रेम करणारा असून विशेष म्हणजे प्राण्यांना हा समाज देव मानणाऱ्यातला आहे. त्यातही हरिण हा प्राणी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर हरिणाची ते पूजाही करतात. त्यामुळेच हरणाच्या रक्षणासाठी हा समाज आपल्या जीवाची बाजीही लावताना दिसतो. राजस्थानमधल्या काही गावात तर महिला हरिणाच्या बछड्यांना आपलं दूधही पाजतात.